बटाट्याची रस्सा भाजी | batata rassa bhaji in marathi

झणझणीत आणि खमंग बटाट्याची रस्सा भाजी -

बटाट्याची रस्सा भाजी | batata rassa bhaji in marathi
 बटाट्याची रस्सा भाजी | batata rassa bhaji in marathi

साहित्य :

 • ४ मध्यम बटाटे 
 • १/२ कांदा 
 • १ टोमॅटो 
 • १ चमचा आले लसूण पेस्ट
 • २-३ चमचे शेंगदाण्याचे कूट 
 • कढीपत्ता  
 • जिरे 
 • मोहरी 
 • १/२ चमचा लाल तिखट 
 • १/४ चमचा हळद 
 • चवीप्रमाणे मीठ 
 • १-२ चमचे तेल 
 • चिरलेली कोथिंबीर 
कृती :
 1. बटाटे उकडून घ्यावे. 
 2. कांदा, उकडलेले बटाटे आणि टोमॅटोच्या फोडी करून घ्याव्यात. 
 3. एका पातेल्यात तेल गरम करून जिरे ,मोहरी ची फोडणी करावी आणि कांदा घालावा. 
 4. कांदा लालसर रंग होईपर्यंत परतून घ्यावा. त्यात चिरलेले टोमॅटो घालून ३-४ मिनिटे परतावे. 
 5. त्यात कढीपत्ता, आले लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतावे. 
 6. नंतर त्यात बटाटयाच्या फोडी आणि शेंगदाण्याचे कूट घालून एखादा मिनिट परतुन त्यात १ कप पाणी घालावे. आणि गॅस मध्यम करून भाजी नीट शिजू द्यावी. गरज असेल तर थोडे पाणी घालावे. 
 7. शेवटी कोथिंबीर घालून एक उकळी आणावी. 
 8. गरम गरम बटाट्याची रस्सा भाजी भात किंवा चपातीसोबत मस्त लागते. 
टीप :
भाजी बारीक गॅसवर झाकण न ठेवता नीट शिजवली तर तेलाचा तवंग येतो अगदी थोडे तेल घातले असेल तरी. 
जर मोठ्या आचेवर भरभर उकळले तर मात्र तेलाचा तवंग येणार नाही पण भाजीच्या चवीमध्ये काही फरक पडत नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या