उकडीचे मोदक बनवण्याची सोपी पद्धत । Ukadiche Modak recipe in Marathi

महाराष्ट्रातील उकडीचे मोदक बनवण्याची सोपी पद्धत

उकडीचे मोदक बनवण्याची सोपी पद्धत । Ukadiche Modak recipe in Marathi
 उकडीचे मोदक बनवण्याची सोपी पद्धत । Ukadiche Modak recipe in Marathi

साहित्य :

उकडीसाठी साहित्य -

 • १ वाटी तांदळाची पिठी ( एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून, सावलीत वाळवून, दळून चाललेली पिठी किंवा बाजारात विकत भेटेल )
 • १ वाटी पाणी ( जितकी तांदळाची पिठी, तितकेच पाणी )
 • चवीपुरते मीठ 
 • २ चमचे तूप 
 • १/२ चमचा तेल 
सारणासाठी साहित्य :

 • १ वाटी गूळ किंवा साखर
 • १ नारळ 
 • वेलची पूड 
 • १/२ वाटी कुटलेले खसखस ( पर्यायी )
कृती :
 1. सारण बनवण्यासाठी - प्रथम नारळ खोवून घ्यावे. एका कढईत खोवलेल्या नारळात साखर किंवा गूळ घालून मंद आचेवर शिजत ठेवा. शिजत असताना मधून मधून हलवत राहा जेणे करून भांड्याला चिकटू नये . 
 2. शिजत आल्यास त्यात कुटलेले खसखस किंवा १ चमचा तांदळाची पिठी घालावी. 
 3. नंतर वेलची पूड घालून सारण एकत्र करावे. पुन्हा थोडे शिजवावे आणि गॅस बंद करावा. 
 4. उकड बनवण्यासाठी - एका भांड्यात पाणी उकळून घ्यावे. त्यात चवीपुरते मीठ, तूप आणि तेल घालावे. 
 5. पाणी उकळल्यावर भांडे आचेवरून खाली घेऊन त्यात पिठी घालून हलवावे. नंतर झाकण ठेऊन मंद आचेवर २ वाफ काढाव्यात. 
 6. आचेवरून खाली उतरवून उकड गरम असतानाच एखाद्या भांड्याच्या मदतीने मळून घ्यावी. उकड थोडी थंड झाली कि हाताला तेल पाणी लावून मोदक बनवता येईल असे मऊसर मळावे. 
 7. मोदक बनवण्यासाठी - उकडीचे लहान गोळे करून त्याची हाताने वाटीचे आकार देऊन त्यात सारण भरावे. कडा थोड्या थोड्या अंतरावर चिमटीने दाबून बंद करून कळ्या पाडाव्या आणि टोक आणावे. किंवा आधी कळ्या पाडून मग त्यात सारण भरावे आणि बंद करून टोक आणावे. 
 8. मोदकाच्या कळ्या या नेहमी विषम संख्येत म्हणजे ३,५,७ आणि ९ पाडाव्यात.   
 9. हे मोदक थोड्या पाण्यात बुडवून एका उकडीच्या चाळणीत स्वच्छ कापड घालून किंवा केळीचे पान ठेवून त्यावर तूप लावून मोदक ठेवून उकडायला ठेवावे. ५-६ मिनिटे उकडून  गरम गरम असतानाच त्यावर तूप घालून खायला द्यावे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या