पालक पनीर | palak paneer recipe in marathi

पालक पनीर रेसिपी मराठीमध्ये - 

पालक पनीर | palak paneer recipe in marathi
 पालक पनीर | palak paneer recipe in marathi


घरगुती पनीर रेसिपी 

साहित्य :

 • १ किंवा १/२ जुडी पालक  
 • २०० ग्रॅम पनीर 
 • १ चमचा लसूण बारीक चिरलेले 
 • १/२ चमचा आद्रक बारीक चिरलेले 
 • ३-४ हिरव्या मिरच्या 
 • १/२ कांदा बारीक चिरलेला 
 • १/२ टोमॅटो बारीक चिरलेला (पर्यायी)
 • १ चमचा जिरे 
 • १/२ चमचा गरम मसाला 
 • १ चमचा लाल तिखट 
 • १ चमचा बटर किंवा लोणी 
 • २ चमचे तेल 
 • चवीनुसार मीठ 
 • २ चमचे मलाई / क्रीम 
 • १/२ कप पाणी 

कृती :
 1. पालक धुवून मिक्सर मध्ये बारीक वाटुन घ्यावे. पाणी घालू नये. 
 2. एका कढईत पनीर, बटर घालून पनीर सगळ्या बाजूने भाजून घ्यावे. ( जर तुम्हाला पनीर मऊ हवे असेल तर पनीर २-३ मिनिटे कोमट पाण्यात भिजवून ठेवावे. नंतर सगळे पाणी वितळू द्यावे आणि बटर टाकून भाजावे.) 
 3. आता एका कढईत तेल गरम करून त्यात बटर घालावे. नंतर त्यात जिरे, लसूण, मिरच्या आणि आद्रक टाकावे. लसूण, मिरच्या आणि आद्रक चांगले परतून घ्यावे. 
 4. आता त्यात कांदा टाकून गुलाबी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावे. 
 5. नंतर त्यात वाटलेले पालकचे मिश्रण आणि १/२ कप पाणी टाकावे. 
 6. मिश्रण उकळाल्यास त्यात चवीनुसार मीठ, तिखट, गरम मसाला आणि पनीर घालावे. 
 7. ५-६ मिनिटे उकळल्यास गॅस बंद करावे आणि वरून मलाई / क्रीम टाकावे आणि एकत्र मिसळावे. 
 8. तयार पनीर चपाती किंवा नान सोबत सर्व्ह करावे. 
पालक पनीर | palak paneer recipe in marathi
 पालक पनीर | palak paneer recipe in marathi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या