नारळाचे लाडू | Naralache Ladoo recipe in marathi

सोपे आणि झटापटीत होणारे नारळाचे लाडू पाककृती -

नारळाचे लाडू | Naralache Ladoo recipe in marathi
 नारळाचे लाडू | Naralache Ladoo recipe in marathi

साहित्य :

 • नारळ 
 • ३/४ कप किसलेले गूळ 
 • १/२ चमचा जायफळ पूड 
 • १/२ कप पाणी 
 • २ चमचे बदामाचे काप ( पर्यायी )
कृती :
 1. नारळाचा वरचा ब्राउन भाग काढावा. नंतर नारळाचे लहान तुकडे करून मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे किंवा किसून घ्यावे.  
 2. एका भांड्यात १ कप बारीक वाटलेले नारळ ३-४ मिनिटे भाजून घ्यावे. 
 3. एका कढईत किसलेले गूळ आणि १/२ कप पाणी घालावे आणि उकळायला ठेवावे. जेंव्हा गुळाचा एक तारी पाक होईल त्यात जायफळ पूड टाकावे आणि सतत ढवळत राहावे म्हणजे भांड्याच्या तळाला चिकटू नये. ( तुम्ही गूळ ऐवजी साखर वापरू शकता )
 4. आता गुळाच्या मिश्रणात भाजलेले नारळ घालून मिसळावे आणि नारळ आणि गूळ एकजीव होईपर्यंत माध्यम आचेवर शिजवावे. जास्त शिजवू नये. 
 5. बदामाचे काप घालावे. गॅस बंद करावे आणि सारण थंड होऊ द्यावे. 
 6. सारण थंड झाल्यास तुपाचा हात घेऊन लाडू वळावेत. हे लाडू ४-५ दिवस टिकतात. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या