मोदक भाजी | Modak bhaji recipe in marathi

मोदकची भाजी पाककृती -

मोदक भाजी | Modak bhaji recipe in marathi
 मोदक भाजी | Modak bhaji recipe in marathi

साहित्य :

 • १ कप बेसन 
 • १ कप खिसलेले खोबरे 
 • १/२ कप शेंगदाण्याचे कूट 
 • १ चमचा लसूण पेस्ट
 • १/२ चमचा लाल तिखट 
 • १/२ चमचा काळा मसाला 
 • १ चमचा हळद 
 • मोहरी 
 • जिरे  
 • १/२ चमचा धने पूड 
 • १/२ चमचा जिरे पूड 
 • कडीपत्ता 
 • चवीपुरते मीठ 
 • तेल 
 • कोथिंबीर बारीक चिरलेली 
कृती :
 1. एका भांड्यात बेसन, लाल तिखट, १/२ चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यावे. पीठामध्ये जास्त पाणी घालू नये. पीठ घट्टच बनवावे. 
 2. आता एका भांड्यात शेंगदाण्याचे कूट, १/२ कप खिसलेले खोबरे, १/२ चमचा लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, आवडीनुसार काळा मसाला आणि कोथिंबीर घालून मिसळून घ्यावे नंतर त्यात १-२ चमचे पाणी घालून सर्व साहित्य मिसळावे. 
 3. बेसन पिठाचे हाताने पुऱ्या बनवून त्यात वरील सारण घालून मोदकचा आकार द्यावा आणि उकडून घ्यावे. मोदक उकडल्यास त्याचा रंग बदलतो. 
 4. मोदक उकडल्यास एका कढईत २ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहरी, जिरे, १/२ चमचा लसूण पेस्ट, कडीपत्ता, धने पूड,  जिरे पूड, काळा मसाला आणि १/२ कप खिसलेले खोबरे घालून फोडणी द्यावी. नंतर त्यात २ कप गरम पाणी घालावे. भाजी जर खूप पातळ वाटत असेल तर बेसन भाजून घालावे. 
 5. आता त्यात चवीनुसार मीठ आणि उकडलेले मोदक घालून भाजी उकळायला ठेवावे. एका उकळी नंतर गॅस बंद करावे आणि वरून कोथिंबीर टाकावी. भाजी खाताना मोदक फोडून मिसळावे. 
 6. गरम गरम मोदक भाजी चपाती किंवा भाकरी सोबत खायला द्यावे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या