तिखट पुऱ्या | Tikhat Purya recipe in marathi

तिखट पुऱ्या पाककृती मराठीमधे 
Tikhat Purya
Tikhat Purya
साहित्य:
1 कप गव्हाचे पीठ
2 चमचे तांदुळाचे पीठ
2 चमचे बेसन
2 चमचे गरम तेल
1 चमचा धनेपूड
1 चमचा जिरेपूड
1/2 चमचा लाल तिखट किंवा चवीनुसार
1/4 चमचा हळद
कोथिंबीर 
मीठ
तेल
कृती:

  1. एका भांड्यात गव्हाचे पीठ, बेसन, आणि तांदुळाचे पीठ एकत्र करावे. त्यात मीठ, लाल तिखट, धने-जिरेपूड, हळद आणि चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करावे.
  2. या मिश्रणात 2 चमचे गरम तेलाचे मोहन घालावे. पाणी घालून घट्ट पीठ मळावे. 15 मिनिटे झाकून ठेवावे.
  3. कढईत मंद आचेवर तेल गरम करायला ठेवावे. बाजूला पीठाचे छोटे गोळे करावेत. या गोळ्यांच्या लाटून पुऱ्या कराव्यात. गॅस मिडीयम आणि हाय यांच्या मध्यावर आणावी. पुऱ्या दोन्ही बाजू पलटवून तळून घ्यावात.
  4. पुरी तळताना ती फुलावी म्हणून पुरीवर  झाऱ्याने काळजीपुर्वक तेल उडवावे. पुरी सोनेरी रंगावर तळून घ्यावी.
  5. तिखट पुऱ्या गरम आणि गारही छान लागतात. 2-3  दिवस टिकतात म्हणून प्रवासात न्यायलाही चांगला पर्याय आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या