शाबुदाणा वडा पाककृती मराठीमधे | Shabudana Vada recipe in marathi

एकादशी, उपवास स्पेशल शाबुदाणा वडा पाककृती मराठीमधे 
शाबुदाणा वडा पाककृती मराठीमधे | Shabudana Vada recipe in marathi
शाबुदाणा वडा पाककृती मराठीमधे | Shabudana Vada recipe in marathi
साहित्य:
 • 1 कप शाबुदाणे 
 • 2 बटाटे 
 • 1/2 कप शेंगदाण्याचा कूट
 • 1 चमचा जीरे
 • 3-4 हिरव्या मिरच्या(आवाडीनुसार )
 • 2 चमचे  लिंबाचा रस
 • चवीपुरते मीठ
 • तेल

कृती :
 1. शाबुदाणे झाकण ठेवून 4 ते 5 तास भिजत ठेवावेत. बटाटे उकडून घ्यावे 
 2. उकडलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे.
 3. मिरच्या बारीक चिरून किंवा वाटून घ्याव्यात.
 4. भिजवलेले शाबुदाणे, बटाटे, मिरच्या, जीरे, शेंगदाण्याचा कूट, लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घालून चांगले मिसळून घ्यावे.
 5. मिश्राणाचे छोटे गोळे तयार करावेत. कढईत तेल गरम करावे आणि वडे गोल्डन ब्राउन होई पर्यंत तळावेत.
 6. आपली स्वादिष्ट आणि चवदार उपवासाचे शाबुदाणा वडे तयार आहेत.

टीप :
 1. शाबुदाणा जास्त भिजवला तर वडे तेलकट होतात.
 2. शाबुदाणा वड्यात पाणी जास्त राहिले किंवा बटाटे चिकट असेल तर  मिश्रण ओलसर होते त्यामुळे वडे तळताना ते फुटतात. अश्या वेळेस शाबुदाणा मिश्रणात थोडे शेंगदाण्याचे कुट मिक्स करावे.


    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या