मिनी पॅनकेक (अंड्यविना) | Eggless Mini pancakes recipe in marathi

झटपट आणि सोपा मिनी पॅनकेक
मिनी पॅनकेक (अंड्यविना) | Eggless Mini pancakes recipe in marathi
मिनी पॅनकेक (अंड्यविना) | Eggless Mini pancakes recipe in marathi
साहित्य :

 • 1 कप मैदा
 • 1/4 चमचा बेकिंग सोडा
 • 1/2 चमचा बेकिंग पावडर
 • चवीपुरता मीठ
 • 2 चमचे पीठी साखर
 • दूध गरजेनुसार
 • 3/4 चमचा लोणी किंवा बटर
 • चॉकलेट सिरप किंवा मध(पर्यायी)

कृती :
 • एका भांड्यामध्ये मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ आणि पीठी साखर  मिश्रित करा. आता यात गरजेनुसार दूध आणि वितळवलेलं लोणी किंवा बटर टाकून चांगल्याप्रकारे मिश्रण करा. नंतर यात थोडे थोडे दूध टाकून हे मिश्रण एकजीव होईपर्यंत चांगलं फेटून घ्या.
 • आता अप्पे बनवण्याचे पात्र  गॅसवर गरम करण्यास ठेवावे. प्रत्येक कप्प्यात बनवलेले पीठ चमच्याने घालून कप्पे भरावेत. झाकण ठेवून मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिटे वाफ काढावी. 


 • झाकण काढून मिनी पॅनकेकची बाजू पलटवावी. परत झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे मिनी पॅनकेक वाफवून घ्यावेत. तुम्ही हे मिनी पॅनकेक नॉनस्टिक तव्यावर ही बनवू शकता.
 • याचप्रकारे सर्व मिनी पॅनकेक्स तयार करा. हे मिनी पॅनकेक चॉकलेट सिरप किंवा मध सोबत सर्व्ह करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या