खोबऱ्याची आमटी पाककृती मराठीमध्ये

साहित्य -
 • १ कप खोबऱ्याचे तुकडे  
 • १/२ कप शेंगदाण्याचे कूट 
 • १ चमचा बेसन 
 • १ चमचा मोहरी
 • १/२ चमचा जिरे
 • १ चमचा लसूण पेष्ट 
 • १/२ चमचा आले पेस्ट
 •  कांदा (चिरलेला )
 •  टोमॅटो (चिरलेला )
 • ४-५ करी पाने
 • १ चमचा धनिया पावडर
 • १ चमचा हळद
 • १ चमचा काला मसाला
 • चवीनुसार मीठ
 • 2 चमचे तेल
 • कोथिंबीर बारीक चिरलेली 


कृती :
 1. कढईत थोडे तेल घेऊन त्यात खोबऱ्याचे काप, चिरलेला कांदा आणि चिरलेला टोमॅटो घाला. ते चांगले भाजून घ्या आणी थंड झाल्यास मिक्सरमध्ये पेस्ट बनवा. 
 2. आता एका भांड्यात बेसन, शेंगदाण्याचे कूट घ्या. त्यात हळद, मीठ आणि 1 कप पाणी घालून मिक्स करावे. 
 3. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे घाला. दोन्ही बियाणे तळाल्यास त्यात लसूण पेस्ट घालावी, लसूण फिकट होईस्तोवर तळून घ्यावे व नंतर आले पेस्ट घालावी
 4. आता कांदा, टोमॅटो, नारळाची पेस्ट घाला (चरण १ प्रमाणे). 
 5.  कढीपत्ता, धनिया पावडर आणि काला मसाला घाला. 
 6. आता पावडर मिक्स घाला (चरण २ प्रमाणे). आणि उकळण्यासाठी ठेवा. उकळत्या नंतर १-२ कप पाणी घाला. 
 7. पुढील ८-१० मिनिटे शिजू द्या. दरम्यान चमच्याणे ढवळत राहा जेणे करुण तलाशी चिटकणार नाही. वरुन कोथिंबीर टाका.
 8. भात किंवा चपाती बरोबर गरम-गरम सर्व्ह करा.
Read recipe in English - Click here 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या