व्हेज मोमोज | Vegetable Momos

व्हेज मोमोज | Vegetable Momos
व्हेज मोमोज
व्हेज मोमोज
साहित्य :
पुरीसाठी 
 • 2 वाटी मैदा
 • 1/2 चमचा बेकिंग पावडर
 • 1/2 चमचा मीठ
 • 2 चमचे तेल
सारणसाठी 
 • 1 चमचा  तेल
 • 1/2 कप कोबी, 1/2 कप गाजर, 1 भोपळी मिरची, 5-6 लसूण पाकळ्या, 1/2 इंच आल्याचा तुकडा, 1 हिरवी मिरची (एकदम बारीक चिरून किंवा किसुन घ्यावे)
 • 1/4 चमचा मिरपूड
 • 1 चमचा सोया सॉस
 • चवीपुरते मीठ
कृती :
 1. एका भांड्यात मैद्या, तेल, मीठ व बेकिंग पावडर, पाणी घालून पीठ 15-20 मिनिटे भिजवून ठेवावे.
 2. कढईत तेल गरम करून त्यात लसूण, आले आणि मिरची परतून घ्यावी. नंतर त्यात सर्व भाज्या घालून परतावे. त्यात मीठ घालून परतून एका भांड्यात काढावे. मिरपूड आणि सोया सॉस घालून मिसळून सारण गार करायला ठेवावे.
 3. भिजवलेल्या मैद्याचे पुरीप्रमाणे छोटे गोळे करून त्याची पातळ पुरी लाटून घ्यावी.
 4. पुरीत सारण भरून मोदकाप्रमाणे छोट्या-छोट्या चुण्या करून पाण्याचा हात लावून पुरीचे तोंड बंद करावे. असे सर्व मोमोज करावेत(मोमोज करंजीच्या आकारातही बनवता येतात).
 5. कूकरमध्ये किंवा इडली पात्रात सर्व मोमोज मोदकाप्रमाणे 7-8 मिनिटे उकडावेत.
 6. गरमागरम मोमोज चिली सॉस किंवा शेजवान सॉस बरोबर सर्व्ह करावेत.
 टीप
 1. मोमोज उकडण्याऐवजी तळून सुद्धा चांगले लागतात.
 2. सारणामध्ये पनीर, टोफू, किंवा नॉन-व्हेजिटेरियन्ससाठी चिकनचे छोटे पिसेस घालू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या