रगडा पॅटिस बनविण्याची विधी | Ragda Pattice recipe in Marathi

Step by step Ragda Pattice recipe. रगडा पॅटिस बनविण्याची विधी.

Ragda Pattice
Ragda Pattice
साहित्य :  
पॅटीस
 • 4 मध्यम आकाराचे बटाटे
 • 2-3 हिरव्या मिरचा (ठेचून)
 • 1 चमचा आले, लसूण पेष्ट 
 • मीठ
रगडा
 • 2 वाटी हिरवे/ पांढरे वाटाणे (7-8 तास भिजवावे)
 • 1 वाटी मोड आलेले मुग 
 • 1 मोठा कांदा (बारीक चिरून)
 • 2 मध्यम टोमाटो (बारीक चिरून)
 • 1 चमचा गरम मसाला
 • 1 मोठा चमचा चिंचेचा रस
 • 1 मोठा चमचा गुळ
 • मीठ
 • कोथिंबीर (बारीक चिरून)
 • बारीक शेव

पद्धत : 
कृती रगडा
 1. वाटाणा साधारण 7-8 तास भिजत ठेवा.
 2. आता वाटाणे कूकरमध्ये घेउन हळद , चवीनुसार मीठ घालून एकत्र करुन घ्या आणि 2-3 शिट्ट्या करुन घ्या.
 3. कढई मध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून  त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा छान रंग बदलेपर्यंत परतून घ्या नंतर टोमाटो, शिजलेले वाटाणे, मुग, चिंच , गुळ, मीठ, गरम मसाला, लाल मिरची पावडर व पाणी घालून जरा दबदबीत रगडा बनवावा.
कृती पॅटीस
 1. बटाटे उकडून घ्या ( 2 शिट्ट्या)
 2. उकडलेले बटाटे कुस्करून त्यामध्ये मिरच्या, आले, लसूण व मीठ घालून मळून घ्या व त्याचे एक सारखे चपटे गोळे बनऊन घ्या. 
 3. तवा गरम करून पॅटीस शालो फ्राय करून घ्या. एका बाजूने लालसर रंग आलाकी दुसर्या बाजूनेसुध्दा लालसर रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करुन घ्या.
खायला देताना प्लेटमध्ये 2 पॅटीस घेऊन त्यावर 2 मोठे चमचे रगडा घालून वरतून कांदा, कोथिम्बीर, टोमाटो, बारीक शेव, चिंचेची चटणी व हिरवी पुदिन्याची चटणी घालून सर्व्ह करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या