पनीर टिक्का पाककृती | Paneer Tikka recipe in marathi

पनीर टिक्का पाककृती मराठी मध्ये  | Paneer Tikka recipe in marathi
Paneer Tikka
Paneer Tikka 
साहित्य:

 • 200 ग्रॅम पनीर
 • 2 ते 3 लहान रंगीत भोपळी मिरच्या (लाल, हिरवा, पिवळा, केशरी)
 • 2 ते 3 छोटे कांदे
 • 5 चमचे दही
 • 1 चमचा धणेपूड
 • 1 चमचा जिरेपूड
 • 1 चमचा लाल तिखट
 • कसूरी मेथी(पर्यायी)
 • 1 चमचा कॉर्नस्टार्च किंवा बेसन 
 • 1/4 चमचा हळद
 • 1 चमचा आले-लसूण पेस्ट
 • मिठ
 • तेल

कृती:

 1. एका भांड्यात दही, कॉर्नस्टार्च, हळद, आले-लसूण पेस्ट, 1/2 चमचा धणेपूड, 1/2 चमचा जिरेपूड, मिठ, 1/2 चमचा लाल तिखट आणि चिमूटभर कसूरी मेथी हे सर्व साहित्य एकत्र करून त्यात पनीरचे दिड इंचाचे तुकडे मिसळुन 15 मिनीटे ठेवावे.
 2. कांदे, भोपळी मिरच्यांचे 1 इंचाचे चौकोनी तुकडे करावे. 
 3. भाज्या चिरून झाल्या कि स्क्युअर स्टिक मध्ये 2-3 तुकडे भाज्या आणि 1 तुकडा पनीर असे ओवावे. 
 4. आता 2  चमचा तेल, 1/2 चमचा धणेपूड, 1/2 चमचा जिरेपूड, 1/2 चमचा लाल तिखट, चिमूटभर मिठ, चिमूटभर कसूरी मेथी असे साहित्य एकत्र करून भाज्यांना अलगद हाताने किंवा ब्रशने लावावे.
 5. ओव्हन 2 ते 3 मिनीटे प्रिहीट करावे. तयार स्क्युअर्स ओव्हनसेफ प्लेटला तेल लावून त्यावर ठेवावे आणि साधारण 2 ते 4 मिनीटे बेक करावे. 
 6. पनीर आणि भाज्या थोड्या ब्राऊन झाल्या कि ओव्हन बंद करून लगेच बाहेर काढाव्यात.
 7. जर ओव्हन नसेल तर मॅरीनेट पनीर तळून घ्यावे किंवा शालो फ्राय करावे आणि भाज्यांना तेल लावून कढईत मोठ्या आचेवर २ मिनीटे परतावे किंवा तंदूरमध्ये भाजून. 
 8. स्क्युअर्स स्टिक वरील भाज्या आणि पनीर हलक्या हाताने प्लेटमध्ये काढाव्यात आणि गरमागरम पनीर टिक्का मसाला पुदीना चटनी सोबत सर्व्ह करावे.

टीप:

 1. जर लाकडी स्क्यूअर्स स्टिक वापरणार असाल तर 1/2 तास गार पाण्यात भिजवून ठेवा म्हणजे ओव्हनमध्ये बेक करताना जळणार नाहीत.
 2. पनीरचे तुकडे खुपवेळ मॅरीनेट करू नयेत. मऊ पडतात आणि बेक केल्यावर वितळतात.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या