कोल्हापुरी कटवडा | How to Make Kolhapuri Kat Vada

चमचमीत आणि चरचरित पदार्थ कोल्हापुरी कटवडा रेसिपी - 
कोल्हापुरी कटवडा
कोल्हापुरी कटवडा
साहित्य :
बटाटा वड्यासाठी:
 • 4 उकडलेले बटाटे
 • 1 चिरलेला कांदा
 • 3-4 हिरव्या मिरच्या(बारीक चिरलेल्या)
 • 7-8 कडीपत्त्याची पाने
 • 1 चमचा हळद
 • कोथिंबीर(चिरलेली )
 • 1 चमचा आले-लसणाची पेस्ट
 • 1 चमचा हिंग, जिरे, मोहरी
 • 1 वाटी बेसन पीठ
 • चवीनुसार हिंग, तिखट, मीठ
 • 1 चमचा मोहन(गरम तेल)
 • तेल 

कटासाठी:
 • 1 वाटी कांद्याची पेस्ट
 • 1 वाटी टोमॅटो पेस्ट
 • 1 वाटी किसलेले ओले खोबरे 
 • 1 वाटी फरसाण
 • 1 तमालपत्र
 • 4 लवंगा
 • दालचिनिचा तुकडा
 • 1 चमचा लसूण पेस्ट
 • चवीनुसार मीठ, लाल मिरचीचे तिखट
कृती :
बटाटा वडा बनवण्यासाठी:
 1. उकडलेल्या बटाट्याच्या बारीक फोडी करून घ्या.
 2. गॅसवर एका कढईत मोहरी, जिरं, हिंग, कडीपत्ता, मिरच्या यांची फोडणी करा. त्यातच कांदा खरपूस परतून घ्या. ही फोडणी बारीक केलेल्या बटाट्यांच्या फोडीवर घाला. चवीनुसार मीठ घाला. आता या मिश्रणात आले-लसणाची पेस्ट मिसळा. या मिश्रणाचे लिंबाएवढे अथवा त्यापेक्षा मोठे गोळे बनवून ठेवा.
 3. बेसन पिठात पाणी, हळद, हिंग, जिरे, तिखट, मीठ, बारीक चिरलेली कोथींबीर आणि चमचाभर मोहन घालुन  भिजवावे. पिठ अगदी पातळ किंवा अगदी घट्ट भिजवू नये.
 4. वड्यासाठी कढईत तेल तापायला ठेवा. तेल तापल्यास भिजवलेल्या पिठात तयार भाजीचा एक गोळा बुडवून तेलात सोडावे आणि गोल्डन ब्राउन होईस्तोवर तळावेत. 
कटासाठी :
 1. गॅसवर एका पॅनमध्ये थोड्याशा तेलात तमालपत्र,लवंगा,दालचिनी परतून घ्या.
 2. त्यावर कांदा पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परता. त्यात किसलेले ओले खोबरे घालुन परता. मग टोमॅटो पेस्ट घालून मध्यम आचेवर शिजवून घ्या. हे सगळं मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करा.
 3. गॅसवर एका जाड बुडाच्या मोठ्या पॅनमध्ये जरा जास्त तेल घ्या. तेल किंचित तापायला आलं की त्यात लाल मिरचीचे तिखट घाला. 
 4. आता त्यात वरील बारीक केलेली पेस्ट घालून चांगले मिसळा. पाहिजे तेवढं पाणी, मीठ घाला. चांगली उकळी आली की गॅस बंद करा आणि  वरुन कोथिंबीर टाका.

सर्व्हिंग डिशमध्ये वडे घेऊन त्यावर कट ओता आणि वर फरसाण, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घाला अन लिंबाची फोड घालून सर्व्ह करा!!!

Read more :

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या