दाल-बाटी चूरमा रेसिपी | dal-baati churma recipe in marathi language

दाल बाटी चूरमा रेसिपी | राजस्थानी दाल बाटी चूरमा | दाल बाटी चूरमा | dal baati churma recipe in marathi 
दाल बाटी चूरमा
दाल बाटी चूरमा
साहित्य :
बाटीसाठी 
 • 3 कप गव्हाचे पीठ
 • 1/2 कप रवा
 • 1 चमचा दही
 • 1 चमचा ओवा
 • चिमुटभर खायचा सोडा
 • 1 चमचा मीठ
 • 1/2 कप तूप 
डाळीसाठी 
 • 1/4 कप मुग डाळ
 • 1/4 कप उडीद डाळ
 • 1/4 कप चणा डाळ
 • 1 कप तूर डाळ
 • 1 कांदा( बारीक चिरलेला)
 • 1 टोमॅटो( बारीक चिरलेले) 
 • 1 चमचा आल्याची पेस्ट
 • 1/2 चमचा हळद
 • 1 चमचा जीरे 
 • चिमुटभर हिंग
 • 2-3 सुक्या मिरच्या
 • 2-4 लवंगा
 • 2 विलयची
 • दालचिनी
 • तपमालपत्र
 • 5-6 कडीपत्ता
 • मीठ, तेल, लिंबू 

चूरमा 
 • बाटी 
 • गुळ (बाटीच्या आर्धे )
 • तुप 

कृती: 
डाळ -
 1. सर्व डाळी कोमट पाण्यात 2 तास भिजवून ठेवा. त्यानंतर हळद घालून शिजवून घ्या.
 2. एका कढईत तेल गरम करा. तेल तापले कि प्रथम तमालपत्र मग जिरे, लवंग,सुकी मिरची घाला. हिंग, कडीपत्ता घाला. फोडणीचा छान वास आला कि, बारीक चिरलेला कांदा आणि आल्याची पेस्ट घालून 3-4 मिनिटे परतून घ्या.
 3. नंतर हळद, लाल तिखट आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून परता. चवीनुसार मीठ घाला आणि 5 मिनिटे छान परतून घ्या. आता त्यात शिजवलेली डाळ घाला आणि उकळत ठेवा. वरून लिंबू पिळून, बारीक चिरलेली कोथंबीर घाला.

बाटी -
 1. भांड्यात गव्हाचे पीठ, रवा, मीठ, खायचा सोडा, दही, ओवा आणि तूप घ्या. पुरेसं पाणी घालून घट्ट पीठ मळुन घ्या.  (चपातीचे पीठ मळतो त्यापेक्षा थोडं घट्टं) पीठाचे लिंबापेक्षा थोडे मोठया आकाराचे गोळे बनवून घ्या.
 2. इडली स्टँडला तुपाचा किंवा तेलाचा हात लावून हे गोळे ठेवा. इडलीपात्रात ठेवून इडलीसारखे 10 मिनिटे वाफवून घ्या. वाफवलेले गोळे थोडे थंड झाले कि, प्रत्येक गोळ्यावरून  किंचित तेल सोडा.
 3. ओव्हन 180°C ला प्री-हिट करून घ्या. बेकिंग ट्रेला तुपाचा किंवा तेलाचा हात लावून त्यावर गोळे ठेवा आणि  ओव्हनमध्ये 20-25 मिनिटे 180°C वर बेक करून घ्या. 20-25 मिनिटाने बाटी परतून साधारण 10 मिनिटे बेक करून घ्या. बाटीचा रंग खरपूस तांबूस होईल. बाटीला थोडे तडे गेले म्हणजे पीठ बरोबर जमून आले आणि बाटी आतापर्यंत बेक झाली समजावे.
 4. ओव्हन नसेल तर आप्पे पात्राला तुपाचा किंवा तेलाचा हात लावून त्यावर गोळे ठेवा आणि 10-15 मिनिट प्रत्येक बाजु भाजून घ्या.
 5. बाटीचा वरचा भाग कडक असतो आणि आतून मऊ असते. गरम गरम बाटी हाताने फोडा.एका बाउलमध्ये  फोडलेली बाटी (बाटीचा चुरा) घ्या. त्याच्यावर 1/2 वाटी तूप ओता (दाल-बाटी मध्ये तूप भरपूर वापरा तरच दाल-बाटी छान लागेल) २-३ मिनिटांनी  तूप छान मुरेल.त्यावर दाळ घाला आणि गरम गरम दाल-बाटी सर्व्ह करा.
चूरमा - 
गरम गरम बाटी हाताने फोडा. एका बाउलमध्ये  फोडलेली बाटी (बाटीचा चुरा) घ्या. त्यात बाटीच्या अर्ध्या आकाराचा गुळ किसुन टाका, 1/2 वाटि तुप आणि हवे ते सुका मेवा टाकून मिसळून घ्या.

Read more :


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या