चॉकलेट सँडविच | chocolate Sandwich in Marathi

chocolate Sandwich in Marathi
chocolate Sandwich in Marathi
साहित्य :

 • 150 ग्रॅम डार्क चॉकलेट(किसलेले)
 • 2 चमचे बटर/लोणी
 • 4 ब्रेडचे तुकडे
 • 8-10 बदाम (बारीक चिरलेले)
 • चीज (किसलेले)
 • चॉकलेट सॉस(पर्यायी )

कृती :

 1. चॉकलेटचे मध्यम तुकडे करून काचेच्या भांड्यामध्ये ठेवून ३० सेकंद मायक्रोवेव्ह मधे वितळून घ्यावे. मायक्रोवेव्ह नसेल तर उकळत्या पाण्यात काचेचे भांडे ठेऊन चॉकलेट वितळून घ्यावे. 
 2. कढईत बदाम भाजून घ्या आणि त्याचे काप करुन घ्या.
 3. एका प्लेटमध्ये ब्रेडचे तुकडे घ्या आणि ब्रेड स्लाईसच्या एका बाजूला बटर लावावे. बटर लावलेल्या 4 पैकी 2 स्लाईस घेवून त्याला वितळलेले चॉकलेट लावावे आणि बदामचे काप टाकून वरती बटर लावलेला ब्रेड स्लाईस ठेवून किंचित प्रेस करावे.
 4. बाहेरून थोडेसे बटर लावून सॅंडविच टोस्टरमध्ये सॅंडविच टोस्ट करून घ्यावे. जर टोस्टर नसेल तर सॅंडविच तव्यावर भाजावे. भाजताना किंचित दाब देउन दोन्ही बाजू लाईट ब्राऊन होईस्तोवर भाजावे.
 5. चॉकलेट सॉस, किसलेले चॉकलेट अणि चीज टाकून सँडविच खायला दया.
टीपः

 1. डार्क चॉकलेट नसेल तर डैरीमिल्क चॉकलेट वापरू शकता.
 2. जर तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर चॉकलेट वितल्यास त्यात कन्डेंस्ड मिल्क टाकू शकता.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या