चिज गार्लिक ब्रेड | Cheese Garlic Bread Recipe

Cheese Garlic Bread Recipe
Cheese Garlic Bread Recipe
साहित्य :
 • 4 ते 5 ब्रेडचे स्लाइस
 • 3 ते 4 चमचे बटर
 • 1 चमचा लसूण (किसलेला  किंवा बारीक़ चिरलेला)
 • 1 चमचा चिली फ्लेक्स
 • 1 चमचा मिरी पूड 
 • चमचा कोथिंबीर
 • 1 वाटी किसलेलं चीज किंवा चीज स्लाइस 

कृती :
 1. ब्रेड स्लाइसला एका बाजूने बटर लावून ठेवून घ्या. 
 2. मग एका भांड्यात बटर, लसूण, चिली फ्लेक्स, मिरी पूड आणि कोथिंबीर एकत्र करून चमच्यानं फेटून घ्या. 
 3. आता हे तयार गार्लिक बटर ब्रेडच्या दुसऱ्या बाजूला लावा.
 4. आता प्रत्येक स्लाइजवर चीज पसरवून स्लाइजेस ओव्हन पॅनवर ठेवून सहा ते सात मिनिटं बेक करा. जर तुमच्याकडे मायक्रोवेव नसेल तर तव्यावर पाच ते सहा मिनिट भाजवे. बेक केलेला ब्रेड धारदार सुरीने कापावा. अशा प्रकारे चिज गार्लिक ब्रेड तयार आहेत.

Read More :

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या